गोवा – गोव्यात काँग्रेसचे नेते रवी नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. गोव्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने नाईक यांचा भाजपा प्रवेश झाला. त्यानिमित्त कार्यक्रमात भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकांचं भलं करू शकतील असे नेते भाजपात येत आहेत. ५० वर्षे लोकांची सेवा करणारे बहुजनांचे नेते रवी नाईक यांनी मोदीजींवर, गोवा मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे.
…तर आदित्य ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, गोव्यातील राजकारणात खूप बदल होत आहेत. लग्न असलं की, काही लोक असे असतात जे बाजा वाजायला लागला की नाचायला लागता. गोव्यात अशा काही पार्ट्या असतात जे नंतर ते गायब होतात. सायबेरियात खूप बर्फ पडतो. त्यामुळे पक्ष्यांना खायला मिळत नाही. त्यावेळी हे पक्षी भारतात येतात. काही पक्ष आणि पक्षी भारतात तयार झालेत जे सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे गोव्यात येतात आणि निवडणुका झाल्या की कोलकात्याचा पक्ष कोलकात्यात आणि दिल्लीतला दिल्लीत. उद्या गोव्याचे पक्ष निर्माण झाले तर दिल्ली, कोलकात्याचा पक्ष नसेल तर गोव्याचे प्रमोद सावंत असतील. रवी नाईक असतील, सदानंद शेठ असतील बाबु पडळकर असतील.
वरळी गॅस दुर्घटना: शिवसेना अनाथ बालकांच पालकत्व स्वीकारणार – महापौर किशोरी पेडणेकर
कोलकात्याचा हा पक्षी आला आहे तो बॅगा घेऊन आला आहे. त्याने दुकान घातले आहे. आमच्याकडे या आणि माल घेऊन जा. राजकारणात दुकान टाकलं आहे. एमजी पक्षाला सांगू इच्छितो. तुम्ही पर्सकरता आकर्षित झाला तर लोकांचे शिव्याशाप (कर्स) मिळतील.
Read Also :
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!