उस्मानाबाद – निधीच्या वाटपावरुन पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाकळर आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात वाद निर्माण झाल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण कामाचे बील आणि समान निधी वाटपाच्या विषयावरुन ही खडाजंगी झाली.
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघात: तब्बल नऊ जणांचा मृत्यू, बिपिन रावतांची प्रकृती चिंताजनक
पालकमंत्री गडाख यांनी, ‘प्रत्येक गोष्ट कारवाई किंवा बिले अडवून करता येणार नाही, यापुढे चुका होणार नाहीत याची काळजी घ्या,’ असे सांगत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तर आमदार कैलास पाटील यांनी यावर बोलणं टाळले. महावितरण आणि इतर सूचनांची अंमलबजावणी झाली नाही तर पालकमंत्री यांची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचा इशारा सावंत यांनी पालकमंत्री गडाख यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. भ्रष्टाचाराचे आरोप करून याबाबत कोर्टात जाण्याची सावंत तंबी यांनी दिली.
दिलीप वळसे पाटलांची बाजी, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
समान निधी वाटप, अखर्चित निधी, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली 5 कोटींची कामे, यासह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्यावर या बैठकीत वादग्रस्त चर्चा झाली. त्यामुळे आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने खासदार आणि पालकमंत्री चांगलेच अडचणीच सापडल्याचे पाहायला मिळालं.
घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, अन्यथा पुढे ढकला; मंत्री छगन भुजबळ आक्रमक
सावंत म्हणाले, ”महावितरणची 5 कोटी रुपयांची कामे प्रशासकीय मान्यता न घेता केल्याने त्याचे बिल अदा करू नये,” या बिलाच्या मुद्यावरून खासदार ओमराजे आणि सावंत यांच्यात वाद झाला. महावितरणाचे कामे कुणी केली? ठेकेदार कोण? यासह अन्य विषयावरील चर्चा वादळी ठरली. त्यावर कामे तुम्हीच करा? तुम्हीच ठरवा? असे सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुनावले. महावितरणची बिले अदा केल्यास भ्रष्टाचाराचे आरोप करून याबाबत कोर्टात जाण्याची तंबी आमदार सावंत यांनी दिली. या विषयात गुत्तेदार हे काही शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत. शिवाय शासकीय बिल असा डबल मलिदा खाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. दरम्यान महावितरणची कामे प्रशासकीय मान्यतेविना करणारे ठेकेदार कोण? त्यांना कुणाचे पाठबळ? याची चर्चा होत आहे.
Read Also :
- उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार