चेन्नई : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही प्रवास करत होती असं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
उटीला जात होते
मिळालेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते
सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा
हवालदार सतपाल
कोण आहेत बिपीन रावत?
डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.
Read Also :
- “आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा”
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार