मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फलटणच्या भाजपच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. ज्यांनी आमच्या भरवश्यावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचे असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागते. मागील दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी अश्या प्रकारच्या वल्गणा करु नयेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जाना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मारला. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केली.
सरकार तुमचंच आहे पण त्याला लुटू नका – अजित पवार
सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली
Read Also :
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात