पुणे – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आंबेगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यांच्या गटात ५७ मतदार होते.
शिवसेना आमदार सूर्यकांत दळवींवर मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीत प्रवेश न करण्यामागचे गूढ उकलले?
या सगळ्या घडामोडींमुळे यंदाच्या हंगामातील बिनविरोध निवडून जाणारे दिलीप वळसे पाटील पहिले मंत्री ठरले आहेत. ते जवळपास १९९१ पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत ६ डिसेंबरपर्यंत होती. अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन २२ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २३ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान व ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी ‘ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील २५ वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. त्यानंतर अजित पवार यांनीही ‘अ’ वर्गातून बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकांमार्फत गुरुवारी दाखल केले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी ३ डिसेंबरला अर्ज दाखल केला होता.
Read Also :
- पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
- अकोले नगरपंचातीमध्ये भाजपचीच सत्ता; वैभव पिचड यांचा दावा
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..