दापोली – दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . त्यामुळे दोन्ही पक्षाची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे.
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असली तरी दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या आघाडीला विरोध आहे . या आघाडीमुळे नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारायला आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दळवी यांनी दिली.
सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. कदम मुंबईत जाऊन दापोलीतील परिस्थिती वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याची माहिती समोर आली होती . या भेटीनंतरच दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची रणनीती स्पष्ट होणार आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापक्षातील उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर आहे, अशी घोषणा केली आहे.
दापोलीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील पदाधिकारी एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यास कायम प्रयत्नशील असतात. मात्र आता चित्र पालटले असून त्याच पदाधिकाऱ्यांना आता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणूक सोडली तर गेली २५ वर्षे दापोली विधानसभा मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे वर्चस्व होते. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची एकहाती सत्ता या विधानसभा क्षेत्रावर राहिलेली आहे. मात्र गेल्यावेळी कुणबी अस्मितेच्या मुद्दय़ावर मतविभाजन होऊन २०१४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
या परभावनांतर त्याचे वर्चस्व कमी होऊ लागले आणि ज्याचे तात्कालिन पर्यावरण मंत्री आणि खेडचे सुपूत्र रामदास कदम यांनी आक्रमकपणे या शिवसेनेच्या बालेकिल्लय़ाची सूत्रे आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत दळवी विरोधकांच्या साह्यने दापोली मंडणगडात कदम यांनी आपले वर्चस्व केले. त्यानंतर हळू हळू त्यांनी सूर्यकांत दळवींना पक्षाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पाडले.
त्यांनतर दापोली विधानसभा मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडून आल्या आणि सूर्यकांत दळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली. कार्यकर्त्यांनी जरी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी देखील सूर्यकांत दळवींनी ऐनवेळी प्रवेश केला नाही. यामागे मातोश्रीवरून आलेल्या संदेशाचा हात होता. त्यामुळे कदाचित या मोठ्या जबाबदारीमुळेच सूर्यकांत दळवी यान पक्ष प्रवेश टाळला असावा.
Read Also :
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार