सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची निवड झाली आहे. दरम्यान उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांना संधी मिळाली आहे. देसाई हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागावी यासाठी विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु पवार यांनी नितीन पाटील यांना बॅंकेच्या अध्यक्षपदी संधी दिली आहे.
ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज (सोमवार) अर्ज भरले जाणार आहेत. त्या अनुषंगाने बॅंकेत विद्यमान संचालक मंडळ उपस्थित राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींचा समावेश आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या अडचणीत वाढ; काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार
दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा एक गटाने पुन्हा शिवेंद्रसिंहराजेंनाच बॅंकेचे अध्यक्ष करा असा आग्रह धरला होता. तर दूसरीकडे गतवर्षी संधीपासून दूरावलेल्या (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालावी अशी मागणी राष्ट्रवादीतून झाली होती. सहकारातील निवडणुका या पक्षीय पातळीवर नसून स्थानिक पातळीवर लढल्या जातात असं नुकतेच स्पष्ट करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा DCC त शिवेंद्रसिंहराजेंना अध्यक्षपदाची संधी देणार की गतवेळी थोड धीर धरा म्हटलेल्या नितीन पाटलांना याकडे जिल्हावासियांची लक्ष लागून राहिलेले होते. अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीन पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे.
Read Also :
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
- एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात
- लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार; मोहितेंनी कोल्हेंना खडेबोल सुनावले