अकोला : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉनचा पहिलारुग्ण राज्यात आढळल्याने राज्यभरातील आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट झाले आहे. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. ओमायक्रॉन संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिला. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
त्यामुळे’ओमायक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता ११७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू केला. जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही. तसेच जमावबंदीच्या कालावधीत लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
डोंबिवलीतील 33 वर्षीय रहिवाशी, जो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून परतला आहे. ही व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार सर्व कार्यवाही केली जात आहे. आज कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. कारण दक्षिण आफ्रिकेकडून ओमिक्रॉन रुग्णांबद्दलची जी माहिती मिळाली आहे, त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. त्याचबरोबर आयसीयू वा ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त नाही. नागरिकांनी एकाच गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे, ती म्हणजे कोविड नियमांचं पालन करायला हवं. त्याचबरोबर ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांनी लस घ्यावी. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करतो की, आपण सहकार्य करावं,’ असं टोपे म्हणाले.
Read Also :
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
- “बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
- लहू बालवडकर “फस्ट एड पॉलिक्लिनिक” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
- अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती