पुणे : सोशल वेलफेअरचे अध्यक्ष लहू बालवडकर यांनी फस्ट एड पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळूंगेतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आज (शनिवारी) सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले असून यामध्ये ३०० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला.
मोफत आरोग्य तपासणी शिबीरासाठी डॉ. राहुल चौधरी, डॉ. यश बहूळीकर, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. निकिता पवार, डॉ. सानिया मुजलकर तसेच कृष्णा डायग्नोस्टिकचे मेटा एक्झिकटिव इम्रान शेख, आणि ऑपरेशन हेड अभिजीत धुमाळ आदी डॉक्टर उपस्थित होते. यावेळी बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळूंगे परिसरातील २०० नागरिकांचे ब्लड टेस्ट करण्यात आले, २० नागरिकांचे एक्स-रे काढण्यात आले, तर १६ नागरिकांचा सिटीस्कॉन करण्यात आला असून बीएमआय यांसारख्या विविध प्रकारच्या चाचण्या देखिल करण्यात आल्या.
लहू बालवडकर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावलौकिकास आले आहे. सोशल वेलफेअरच्या माध्यमातून बालवडकर नेहमीच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतात. सुस, म्हाळूंगे, बाणेर, बालेवाडीतील नागरिकांसाठी क्रिकेट स्पर्धा, अन्नधान्य वाटप, आर्थिक समस्यांसोडवण्यासारखे विविध उपक्रम राबवत असतात. दरम्यान, सामाजिक कार्याबद्दल नुकताच त्यांना एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्यातच आज त्यांनी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. नागरिकांचा आरोग्य शिबीराला उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबीराला किर्तनकार ह.भ.प.संतोषमहाराज पायगुडे शिवशंकर बालवडकर, मधुकर बालवडकर, पप्पुशेठ चांदेरे, ॲड.पांडुरंग थोरवे, गणेश कळमकर,प्रल्हाद सायकर,संजय कांबळे, काशिनाथ बालवडकर, राजेंद्र सारंगे,अजय सांळुके,दिलीपनाना बालवडकर, गजानन बालवडकर राजेन्द्र मांगडे आदी उपस्थित होते.
Read Also :
- बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
- अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
- सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
- …तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू