पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ (‘SHIVDE I AM SORRY’) या पोस्टरची चर्चा झाली होती. त्यानंतर पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. आता सध्या असेच एक बॅनर शहरात झळकले आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे वाक्य लिहिलेले पोस्टरने सगळ्यांनाच विचार करायला लावले आहे. शहरातील नेहरूनगर – यशवंतनगर रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचाराची राळ उडवून देत आहेत. तर दुसरीकडे विविध गृहप्रकल्प, विविध व्यावसायिक आपला ब्रँड अल्पावधीत सर्वतोमुखी व्हावा, यासाठी असे उत्कंठावर्धक बॅनर व पोस्टरबाजी करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परिणामी शहरात हटके फलक लावण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक बॅनर सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक राजकीय वतुर्ळातदेखील चर्चा रंगली आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असा नारा देत एका व्यावसायिकाने जाहिरातबाजी सुरू केली आहे. अशा प्रकारे जाहिरात करून अनेकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात पोस्टरबाजी करणे हे काय शहरवासीयांसाठी नविन नाही. काही महिन्यापुर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ (‘SHIVDE I AM SORRY’) या पोस्टरची चर्चा झाली होती. त्यानंतर पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून पक्षांतर्गत कलह उघड केला होता. त्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षामधील कलह लपून राहिला नव्हता. तसेच माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा आशयाचे फलक शहरभर लावून सत्ताधारी भाजपच्या आश्वासनाची चिरफाड केली होती.
तसेच वादग्रस्त प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आलेले महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त का केले ? असा सवाल आयुक्त राजेश पाटील यांना फ्लेक्सच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. असे फ्लेक्स ‘साठे परिवार आणि पिंपरी-चिंचवडकरां’च्या वतीने शहरात झळकले होते.
Read Also :
- …तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी नारायण राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठोकला शड्डू
- देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत… विचार करण्याची वेळ
- आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे? – फडणवीस
- ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..