सिंधुदुर्ग – सातारा, सांगली, मुंबै, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांपाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी तब्बल ३३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . १९ जागांसाठी होणार्या या निवडणुकीत तब्बल ९१ उमेदवार मैदानात उतरले आहेत.
ही निवडणूक प्रक्रिया ३० तारखेला होणार आहे. तर ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी ६ डिसेंबर रोजी अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे. यानिवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात संघर्ष बघायला मिळणार आहे.
आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी एकत्र येत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच पॅनल उभा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणीत पॅनल उभा केल आहे. यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे.
शेवटच्या दिवशी तब्ब्ल ३३ उमेदवारी अर्ज असे मिळून एकूण ९१उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी सोमवार ६ डिसेंबर रोजी होणार असून ७ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे मतदान होणार आहे. तर ३१ डिसेंबर जिल्हाबँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आजीमाजी दिग्गज रणांगणात :
यामध्ये राजन तेली, कणकवली (नागरी सहकारी बँक) राजन तेली, कणकवली (इतर कायद्याखालील संस्था) मनीष दळवी, वेंगुर्ले (सग्लन शेती), प्रकाश गवस, दोडामार्ग (संलग्न शेती), चंद्रशेखर सावंत, कुडाळ (इतर कायद्याखालील संस्था), विकास सावंत, सावंतवाडी (इतर कायद्याखाली संस्था), विकास सावंत, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था), चंद्रकांत नाईक, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था), समीर सावंत, कणकवली (इतर कायद्याखालील संस्था), प्रज्ञा ढवन, कणकवली (महिला प्रतिनिधी) निता राणे, कुडाळ (महिला प्रतिनिधी) नागेश मोरये, कणकवली (इतर मागास वर्गातील सदस्य), गणपत देसाई, दोडामार्ग (संलग्न शेती), सुभाष मडव, कुडाळ (संलग्न शेती), दत्ताराम वारंग, सावंतवाडी (संलग्न शेती), गजानन गावडे, सावंतवाडी (संलग्न शेती), अस्मिता बांदेकर, कुडाळ (महिला प्रतिनिधी) अतुल काळसेकर, कणकवली (इतर मागास वर्गीय), व्हिक्टर डांन्टस, मालवण (संलग्न शेती) विष्णू कुबल, दोडामार्ग (संलग्न शेती), सचिन देसाई, वेंगुर्ला (सलग्न शेती), नकुल पार्सेकर, सावंतवाडी (अनुसूचित जाती/जमाती), गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी (संलग्न शेती), दिलीप पारकर, कणकवली (संलग्न नागरी सहकारी बँक) विलास गावडे, वेंगुर्ला (संलग्न शेती), विलास गावडे, वेंगुर्ले (इतर कायद्याखालील संस्था) सुरेश चौकेकर, मालवण (अनुसूचित जाती), कमलाकांत कुबल, मालवण (संलग्न सहकार शेती), अर्चना घारे, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था) अर्चना घारे, सावंतवाडी (महिला प्रतिनिधी) मनीष पारकर, कुडाळ (इतर मागासवर्गीय) गणेश राणे, देवगड (संलग्न शेती), प्रकाश बोर्डस, देवगड (संलग्न शेती) या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Read Also :
- देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत… विचार करण्याची वेळ
- आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे? – फडणवीस
- ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
- “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यावरून दोन वकिलांमध्ये होणार संघर्ष; सदावर्ते विरुद्ध परब संघर्ष न्यायालयात होणार सुरु