मुंबई – राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात भाजपविरोधी आघाडीच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली. यादरम्यान जोरदार पाऊसही सुरू होता. त्यावेळी पवार साहेबांनी छत्री घेऊन सभागृहाकडे प्रस्थान केले. याचे फोटो ट्विट करत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पवारांना टोला लगावला आहे.
साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
यावेळी सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत पवारांवर टीका केली. शरद पवार साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला. पण पावसाला तरी कुठे माहित आहे पवार साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतांनाच पावसात भिजतात, बाकी वेळेस साहेबांकडे छत्री उपलब्ध असते, असा खोचक टोला खोत यांनी ट्वीटवरून लगावला. खोत यांनी शरद पवार आणि ममता बॅनर्जी छत्री घेऊन उभे असतानाचा फोटोही ट्विट पोस्ट केला आहे.
साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला…
पण पावसाला तरी कुठे माहित आहे साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतांनाच पावसात भिजतात बाकी वेळेस साहेबांकडे छत्री उपलब्ध असते. pic.twitter.com/AQESy3bbOT
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 3, 2021
उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाविरोधी आघाडीच्या मुद्यावर त्यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर पवारांनी देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर पवारांच्या या विधानावर भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे.
Read Also :
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी
- वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक