सातारा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या सहा डिसेंबरला किल्ले रायगडास भेट देणार आहेत. दरम्यान शिवप्रेमींनी रायगडवरील होळीचा माळ येथे हेलिकॉप्टर उतरविण्यास विरोध दर्शविला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारचा एकही अधिकारी राष्ट्रपतींना रोप-वे मधून नेण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे राष्ट्रपती हे चॉपरने (हेलिकॉप्टर) रायगडावर येतील. होळीचा माळ येथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा योग्य पद्धतीने अच्छादित (कव्हर) करु, जेणेकरुन धूळ वगैरे उडणार नाही, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.
मोठी बातमी: ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव; कर्नाटकमध्ये दोन रुग्ण सापडले
येत्या सहा डिसेंबरला राष्ट्रपती किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. परंतु होळीच्या माळावर हेलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिपॅड होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धुळ, माती, केर कचरा उडत असे. ही धुळ, माती होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर उडत असे. त्यामुळे सन १९९६ मध्ये येथे उपोषण करून येथील हेलिपॅड काढुन टाकण्यात आला आहे. आता पुन्हा २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने आम्हा सर्व शिवप्रेमींचा होळीचा माळ येथे हेलिकॉप्टर उतरविण्यास विरोध असल्याचे नितीन पावले, सिद्धेश पाटेकर यांनी नमूद केले आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या किल्ले रायगड भेटीबाबतची माहिती मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नुकतीच दिली. त्यावेळी त्यांनी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर धुळ उडू नये यासाठी संपुर्ण शिवपुतळा हा योग्य पद्धतीने अच्छादीत करु असे म्हटलं आहे.
Read Also :
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी
- वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक
- किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; राष्ट्रपतीच्या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध
- पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?