रायगड : शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र आता यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना अगर उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धूळ, माती, केर कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने 1996 ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढुन टाकण्यात आला होता. सुमारे 25 वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध केला जात आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत किल्ले रायगडावर नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रस्ता सुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येणार आहे.
‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. या आधी 1980 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडवर आल्या होत्या. 1985 साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. 3 एप्रिल 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी महाराजांची प्रतिमा असलेले 2 रुपये किंमतीचे नाणे भारत सरकारच्या वतीने काढण्यात आले होते.
Read Also :
- पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
- नगरमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा? सुजय विखेंचा कोल्हेंना प्रश्न
- मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!
- महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश
- टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध