जळगाव – जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे पॅनल बहुमताने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या प्रयत्नातून जळगाव जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनेवर्चस्व निर्माण केले आहे.बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक आज पार पडणार आहे. जिल्हा बँकेत सुरवातीचे तीन वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असणार आहे . हे पाहता अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांची नावे चर्चेत आहेत.
चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो
जिल्हा बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक संचालक आहेत . त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष होणार आहे.यासंदर्भात पक्षाची कोअरकमेटी बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत नाव जाहीर झाले नाही, शुक्रवारी सकाळी निवडणुकीच्या अगोदर सकाळी अकराला नाव जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील,एकनाथ खडसे,राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर, कॉंग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील आदी उपस्थित होते.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव अग्रस्थानी आहे, मात्र विद्यमान चेअरमन ॲड. रोहिणी खडसे यांना पुन्हा संधी मिळणार अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. तर एकनाथ खडसे यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अवमान; भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
महाविकास आघाडीचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला दोन वर्षे, कॉंग्रेसला दोन वर्षे व राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक वर्षे देण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच जिल्हा बँकेचा अध्यक्ष होईल. अध्यक्ष निवडीसाठी अजित पवार यांनी आपल्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. संचालकाच्या आज होणाऱ्या बैठकीत नाव निश्चित करण्यात येईल व त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे अध्यक्षपद मिळणार असल्याने खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना एक वर्ष मुदतवाढ देवून अध्यक्ष करण्यात यावे असा निर्णय होण्याची शक्यता आहे. गुलाबराव देवकर तसेच इतर इच्छुकांना पुढील वर्षी पद देण्यात यावे असा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मात्र, जर हा प्रस्ताव मान्य झाला नाही. तर अध्यक्षपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात येईल.
Read Also :
- कारवाईचा बडगा: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करणार; अनिल परबांचा इशारा
- चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब – नवाब मलिक
- चिंता वाढली: दक्षिण अफ्रिकेतून मुंबई विमानतळावर आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह
- चीनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी आत्ताच सावध व्हा; शिवसेनेचा केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला
- मावळ तालुक्यात झालेले ‘ते’ दोन पक्षप्रवेश पडणार कोणाच्या पथ्यावर?