मुंबई : मागच्या वर्षी भारतीय लष्कर आणि चिनी सैनिक यांच्यात गलवान खोऱ्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. गलवान घाटीमध्ये झालेल्या संघर्षात चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे काही भारतीय जवान शाहिद झाले होते. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय सैनिकांनी देखील चीनच्या अनेक सैनिकांना यमसदनी धाडले होते.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
चीनची दुसऱ्या देशांसोबत जागेच्या बाबतीत संघर्ष करण्याची सवय आता लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादाच्या नावाखाली इतर देशांच्या सीमांवर आक्रमण करणारी चीनची वृत्ती आता जगासमोर आलेली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी नुकतीच देशात ३ लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे. चीनही ही घोषणा हलक्यात न घेण्याचेही शिवसेनेनं सूचवलं आहे. युद्धासाठी पुढाकार घेण्याची आणि त्यासाठी ३ लाख सैनिकांची भरती करण्याची चीनने केलेली घोषणा म्हणजे हवेतील गोळीबार नसून त्यामागचे धोके आता जगाने समजून घेणे आणि खास करून भारताच्या राज्यकर्त्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
भारतातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश यांसारख्या सीमेवरील भागांत चीननेवारंवार चालविलेली घुसखोरी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी वापरलेली युद्धखोरीची भाषा याचा संबंध आता पडताळून पाहवाच लागेल. जशी चीनला युद्धाची खुमखुमी कायमच असते, ती खुमखुमी आता कशी जिरवायची याची रणनीती हिंदुस्थानलाही आखावीच लागेल, अशा शब्दात शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारला सूचनावजा सल्ला दिला आहे.
साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
बाकी जगाचे सोडा मात्र चीनची ही युद्धखोर नीती हिंदुस्थानसाठी सदैव डोकेदुखीच ठरली आहे. शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून चीनच्या युद्धखोर कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायम गुरगुगुरतगु राहणेआणि दंडाच्या बेडक्या फुगवून शक्तिप्रदर्शन करणे, ही चीनची जुनी खोड आहे. आताही चीननं हेच धोरण अवलंबलेलं दिसत आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.
Read Also :
- मावळ तालुक्यात झालेले ‘ते’ दोन पक्षप्रवेश पडणार कोणाच्या पथ्यावर?
- पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता महेश लांडगे!
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली