परभणी – परभणी महापालिका निवडणुकीचे वेध लागले असतांनाच येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल मैदानात उतरणार आहे. या निवडणुकीसाठी नुकतेच काॅंग्रेसमधून बाहेर पडलेले विद्यमान नगरसेवक सचिन देशमुख यांना आमदार गुट्टे यांची साथ असणार आहे. स्वच्छ प्रतिमा व काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवारांना पॅनलद्वारे निवडणुकीची संधी देवून संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविली जाईल, असे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘या’ नगर पंचायतींसाठी सेना, राष्ट्रवादी विरोधात फडणवीस स्वतः उतरले मैदानात
परभणी महापालिकेतील कॉग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा कॉग्रेसकडे दिला आहे. सत्ताधारी कॉग्रेस लोकहिताची कामे करत नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगत सचिन देशमुख यांनी पक्ष सोडला होता. त्याचवेळी सचिन देशमुख यांना आमदार रत्नाकर गुट्टे हे पाठींबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानुसार गुट्टे यांनी माहिती दिली.
गुट्टे म्हणाले, “परभणी महापालिका ही महापालिका आहे का असा प्रश्न पडतोय? शहराचा विकास सोडून केवळ सेटलमेंटचे राजकारण सत्ताधारी पक्षासह इतर सर्वच पक्षांकडून होत आहे, महापालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही. आपण स्वतः या शहरातील विकास कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यामुळे आमच्याकडे शहर विकासाचे व्हिजन असल्याने आम्ही शहराचा विकास निश्चित चांगल्या प्रकारे करू शकतो. सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल या निवडणुकीत उभे केले जाईल. आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षासी आम्ही युती – आघाडी करणार नाहीत, शहरातील सर्व जागा स्वबळावर लढवू”
वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
तर सचिन देशमुख म्हणाले, “याआधी परभणीतील जुन्या, अनुभवी नेत्यांनी ज्या मोठ – मोठ्या इमारती बांधल्या त्या इमारतीची देखभाल दुरुस्तीच सत्ताधारी करू शकत नाहीत. तर ते शहराचा विकास काय करणार? तेच तेच चेहरे निवडणुकीत निवडून येतात व सेटलमेंटचे राजकारण सुरु होते. हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी आम्ही विकासाची जाण असणारे अनुभवी व तरूण युवकांना संधी देणार आहोत. विकासाचा अजेंडा घेवून ही निवडणुक लढविली जाईल ”
Read Also :
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
- “माताजींच्या दौऱ्यात उद्योग हा केवळ बहाणा, मूळ उद्देश राजकीय”; फडणवीस यांचा दावा
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा