नागपूर – गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार यांनी एकहाती विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकतर्फी विजय मिळवत झेंडा फडकावला. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप मागे राहिला. त्यामुळे आता भाजपाने चांगलीच कंबर कसली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः हिंगणा आणि कुही नगर पंचायत निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
२५ वर्षांचा संसार मोडला, मात्र आमचे प्रेम अद्यापही कायम; गिरीष महाजनांची कबुली
२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिंगणा आणि कुही नगर पंचायत निवडणुकीवर भाजपाचे लक्ष आहे. नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल फडणवीसांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीत सुनील केदार यांनी भाजपाला धक्का देत ग्रामीण भागातील जनतेचा पाठिंबा मिळवला होता. मागील निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस मैदानात उतरले असते तर जिल्हा परिषदेचे चित्र वेगळे असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने आता सावध पवित्रा घेतला आहे.
हिंगणा व कुही नगर पंचायत निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र बेहरे यांच्याकडून नगर पंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. नगर पंचायतीमध्ये भाजपा आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला. विकासाची ही शिदोरी घेऊन जनतेपुढे जाणार आहे. तसेच काही माजी नगरसेवक अपक्ष पॅनल उभे करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत समीर मेघे यांच्याशी चर्चा करून पक्षातील नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात येईल. सोबतच, निवडणुकीच्या कामाला जोमाने लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला; किरीट सोमय्यांची अमरावतीतून फायरिंग
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान, निवडणुकीच्या काळात हिंगणा येथे प्रचारसभा घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. कुही नगर पंचायत निवडणूक प्रभारी माजी आमदार सुधीर पारवे यांनी नगर पंचायतीमधील राजकीय परिस्थिती मांडली. जनतेच्या सतत संपर्कात पदाधिकारी आहेत. या निवडणुकीत मतदार पक्षाला साथ देतील, अशी भावना त्यांनी व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नगर पंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असा दम फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
- शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !
- ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?
- “ममताजी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायेत आणि शिवसेना मदत करतेय का?”
- एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार