मावळ : राज्यात लवकरच स्थानिक संस्थांचे बिगुल वाजणार आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारणाला ऊत आला आहे असं म्हणायला हरकत नाही. निवडणूक तोंडावर आल्याने आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला पहिला धक्का दिला आहे.
मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप व कॉंग्रेसला धक्का देत त्यांच्या विद्यमान नगरसेवक व त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत आणले आहे. यामुळे एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ विधानसभा निवडणुकीनंतर आता आणखी खिळखिळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी जिल्हा परिषद गट-गण, तालुका पंचायत, नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत आमदार शेळके यांनी सुरु केलेल्या या इनकमिंगचा मोठा फायदा होणार आहे. त्यातच मावळ तालुक्यातील नवनिर्मित देहू नगरपालिकेची आता एकदमच तोंडावर आलेली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
त्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहू गावचे माजी उपसरपंच व पूर्वाश्रमीचे भाजप समर्थक स्वप्नील काळोखे यांनी आपल्या समर्थकांसह काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुंबई कार्यालयात प्रवेश केला. मावळसह ठाणे ग्रामीण आणि वाशीम जिल्ह्यातील अनेकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हातावर घड्याळ बांधले.
सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
एवढंच नाही तर मावळातील लोणावळा नगरपरिषदेतील कॉंग्रेसच्या गटनेत्या, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर तसेच भाजपचे माजी गटनेते व नगरसेवक भरत हरपुडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सामाजिक कार्यकर्ते गणेश इंगळे यांनीही काल राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मावळातील ताकद आणखी वाढणार आहे.
Read Also :
- पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता महेश लांडगे!
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार