– सार्वजनिक कार्यक्रम अन् समारंभांना पिंपरी-चिंचवडकरांची तोबा गर्दी
पिंपरी चिंचवड : पहाटे ६ वाजता आयोजित केलेली रिव्हर सायक्लोथॉन असो किंवा रात्री ९ वाजता झालेला अभिष्ठचिंतन सोहळा. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यक्रमाला २५ ते ३० हजार लोकांची गर्दी जमते. पण, दुसरीकडे एखाद्या राजकीय नेत्याला कार्यक्रम घेवून गर्दी जमवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागले. यावरुन पिंपरी-चिंचवड शहराचे सक्षमपणे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून महेश लांडगे यांची वाटचाल सुरू आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी, शिवसेनासह काँग्रेसकडून कार्यक्रम, जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, सार्वजनिक कार्यक्रम घेवून हजारो लोकांची गर्दी खेचून शक्तीप्रदर्शन करण्याचा अनेकांचा कार्यक्रम अगदी सपशेल फेल झालेला पहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि अभिनेता असलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी रस्ते भूमिपूजन, आंदोलन, सभा, बैठका घेण्याचा सपाटा लावला. पण, डॉ. कोल्हे यांच्या कार्यक्रमांना अवघी दोनशे ते अडिचशेही लोक उपस्थित नसल्याचे चित्र दिसत होते.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगवी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला शहरातील दिग्गज नेते विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे अशी तगडी फळी उपस्थिती होती. मात्र, राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता मेळावा अवघ्या सातशे-आठशे लोकांच्या उपस्थित उरकण्यात आला. तत्पूर्वी, शिवसेने नेते आणि खासदार संजय राउत यांनीही पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा घेतला. त्या मेळाव्याला दोनशे ते अडिचशे शिवसैनिक उपस्थित होते. काँग्रेसचे संघटनात्मक कामही तितकेसे दमदार दिसत नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
महेश लांडगेंची लोकप्रियता वाढतेय…
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या स्थानिक तसेच राज्य स्तरावरील नेत्यांचे पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रम फेल होत असताना दुसरीडे भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी मात्र कार्यक्रमांचा धडाका सुरू केला. प्रभागनिहाय विविध कार्यक्रम घेत वाढदिवस दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे, भारतातील सर्वांत मोठी रिव्हर सायक्लोथॉन घेतली, त्याला सुमारे १२ हजार हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. तसेच, भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित अभिष्ठचिंत सोहळ्याला ३५ हजारहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे भाजपाचे महेश लांडगे यांची लोकप्रियता कमालीची वाढलेली दिसत आहे.
Read Also :
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा