पुणे – सातारा, सांगली जिल्ह्यांनंतर आता पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा समझोता एक्सप्रेस धावण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. सर्वच राजकीय नेते हे आपापल्या परीने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
दुसरीकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी देखील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यमंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता. 1) ‘ ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मागील २५ वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने पून्हा एकदा बँकेवर जाण्याचा भरणे मामा यांचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे. आता भरणे यांच्याविरोधात उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे . २ जानेवारी २०२२ रोजी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राज्यमंत्री भरणे हे मागील २५ वर्षापासून संचालक असून त्यांनी अध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. भरणे हे मागील अनेक वर्षापासून ‘ब ’ वर्गातून निवडणूक लढवत आहेत.
कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
भरणे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताना भरणे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रवीण तुपे, जयदीप काळभोर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
भरणे यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भरणे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळं वळणं मिळालं आहे. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भरणे आणि पाटील या दोघांमधील राजकारण रंगणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
Read Also :
- “आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
- वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
- ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
- शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !