कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याचा सोमवार हा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी दिग्ग्ज नेत्यांनी आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दुसऱ्या दिवशी देखील बऱ्याच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच महत्व कमी झालं – नवाब मलिक
अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातून तर मंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील यांनी शिरोळमधून अर्ज भरला आहे. माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचा मुलगा बँकेचे संचालक रणजित पाटील, शाहूवाडीतून संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला गटातून संचालक माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे, कृषी व पणन या गटातून खासदार संजय मंडलिक, संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, इतर शेती विभागातुन संचालक भैय्या माने, ओबीसी गटात संचालक असिफ फरास, विलासराव गाताडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
मागील आठवड्यात कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक पार पाडण्यात आली. एकमेकांचे कट्टर वैरी असणारे आमदार बंटी पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. मात्र जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि इतरही काही आमदारांनी मध्यस्ती केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. जर दोन कट्टर विरोधकांची निवडणूक ही बिनविरोध होते आणि मोठा घोडेबाजार यामधून टळत असेल तर हेच गणित जिल्हा बँकेसाठी का नको? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
सर्व नेते निवडणूक बिनविरोध कशी होईल याचा विचार करतील. तो निर्णय आम्ही निश्चित घेवून त्यांनी केलेल्या सुचनेनूसार आम्ही फॉर्म भरत आहे. जिल्ह्यातील इतर नेते, राजकीय पक्षांची निर्णय घेवून बोर्ड कसे असावे हे ठरवले जाईल. प्रत्येकाच्या तालुक्यातील प्रतिनिधी कोण-कोण येणार हे ठरवले जाईल. असे आत्तापर्यंतचे नियोजन आहे. तालुक्यातील जागा आणि उमदेवारांची एकत्रित येतील. शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले जाईल. पुढील निर्णय एकत्रित बसून होईल. यात जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आवाडे यांनी नमूद केले.
Read Also :
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप