मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा घातक असा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. डोंबिवलीतील एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मंत्री नवाब मलिकांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा; कोर्टाकडून 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर
आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले. ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत आढावा बैठक घेत आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी शहरातील परिस्थितीबद्दल भाष्य केलं. ‘राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका
‘शहरात आतापर्यंत १०२ टक्के लसीकरण पहिला डोस पूर्ण झाले आहे, ७२ टक्के लोकांनी कोरोनाचा लशीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाच्या वेगासाठी दोन डोस मधील अंतर कमी करणं गरजेचं आहे तशी विनंती केंद्राकडे केली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका अजून टळलेला नाही. दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. शाळा आपण सुरू करत आहोत. पण काळजी घेणं गरजेचं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Read Also :
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
- अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
- …आणि पंकजा ताईंना पान तयार करण्याचा मोह आवरता आला नाही!