मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी या सर्व प्रकरणामागे भाजप नेते मोहित कंबोज यांचा हात असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर कंबोज यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकला होता. याप्रकरणी मलिक यांना नुकताच 15 हजारांचा वैयक्तिक जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.
‘आम्ही पाडणार नाही, हे आघाडी सरकार अंतर्विरोधानेच पडेल’; फडणवीसांचा दावा
जामीन मंजूर झाल्यामुळे नवाब मलिकांना मानहानीच्या प्रकरणातून अखेर दिलासा मिळाला आहे. माझगाव कोर्टाकडून हा 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मलिकांना मंजूर झाला आहे. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहितीही कोर्टाने दिली आहे.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर बोलताना मलिक म्हणाले, ”माझ्यावर एक मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याबाबतचं समन्स मिळाल्यानंतर मी आज कोर्टात हजर झालो होतो. यावेळी मला कोर्टाने विचारलं की, मी मोहित कंबोज यांची बदनामी करत आहे. त्यावेळी मी कोर्टाला अशाप्रकारे कोणाची बदनामी करत नसून केवळ सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणत्याही प्रकारे कोर्टाचे आदेश न धुडकावता बोलत आहे.”
“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी का?”
मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा स्वतः तिकीट काढून क्रूझवर गेला नव्हता, तर आर्यन क्रूझवर यावा म्हणून भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मेहुण्यानं षडयंत्र रचलं होतं, असा आरोप मलिकांनी केला होता. मलिकांच्या या खळबळजनक आरोपांनंतर मोहित कंबोज यांनी मलिकांवर मानहानीचा दावा ठोकला होता. दरम्यान आता या प्रकरणी मलिकांना जामीन मंजूर झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
Read Also :
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
- अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
- …आणि पंकजा ताईंना पान तयार करण्याचा मोह आवरता आला नाही!
- लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका