मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतो आहे. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत. यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
नवाब मलिक यांची भूमिका ड्रग माफियांसाठी फायदेशीर ठरली; निलेश राणेंचा सनसनाटी आरोप
भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’ असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला. या डान्सचा व्हिडोओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
मात्र, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करत “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता, असे म्हणत विखेपाटील यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
Read Also :
- …आणि अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर !
- ‘केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- ‘१ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?’; राजेश टोपे म्हणाले…
- महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच पर्दाफाश..
- बालेवाडी प्रीमियर लीग’मधे “साईकृपा संघ”चा ठरला विजय; लहु बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन