मुंबई – कोरोनाच्या नव्या व्हेरींऍंट चा धोका पाहता केंद्रासाहित राज्य सरकारने देखील प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. अशा वेळी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो का असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी यावर आपलं उत्तर दिले.
एसटी संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी; जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट
राजेश टोपे म्हणाले, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होईल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नाही. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासोबत बैठक झाली. या बैठकीत शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबर रोजीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश प्रशासनाला दिले आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच पर्दाफाश..
- बालेवाडी प्रीमियर लीग’मधे “साईकृपा संघ”चा ठरला विजय; लहु बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
- आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
- चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय हायकमांड नाराज, महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात अपयशी – सूत्र
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र