मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचारी विलगीकरण्याच्या पगारवाढीच्या मागणीवरून संपावर गेले होते. अशातच आता एसटीच्या संपातील पाठींबा दिलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे.
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश
परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केल्याचे दिसत आहे. असे असतानाही एसटी आंदोलकांचे वकिल ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या इशाऱ्यानंतर आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. काहीठिकाणी कर्मचाऱ्यांनी संपाला फाटा देत डेपोमध्ये एसटीच्या कामास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडींनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी संपात भाग घेतलेल्या एका नेत्यावर टीका केली आहे. एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना फसवून प्रत्येकी ३५०रुपये घेतले असा दावा आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
350 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून
70000 कर्मचारी
कर्मचाऱ्यांची लूट
ST संप
कर्मचारी उपाशी
नेते तुपाशी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 26, 2021
आंदोलनातील प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेण्यात आले आहेत . एकूण ७० हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली आहे . “ST संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ
दरम्यान, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची लवकरच कामावर हजर राहावे, अन्यथा कठोर निर्णय घेऊ अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते होत नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यापूर्वी म्हटले होते. कोणताही नेता किंवा वकील हा कामगारांना जागवायला येणार नाही. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणानेआपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावे, असेसं देखील काल संजय राऊत यांनी म्हटले होते.
Read Also :
- महेश लांडगे ‘ऑन प्रॅक्टिकल मोड’ : अधिकारी पिंपरी- चिंचवडकर आहेत; आयुक्तांचे ऐका अन् माझे फ्लेक्स काढून टाका!
- महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!
- शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर छापा; किरीट सोमय्यांच्या आरोपावर ED ‘अॅक्शन मोड’मध्ये
- पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले
- कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार