– भाजपा शहराध्यक्ष तथा महेश लांडगे यांचे कार्यकर्ते, समर्थकांना आवाहन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. सर्व अधिकारी आपलेच आहेत. त्यांना सहकार्य करा. प्रशासनाची अडवणूक करू नका. माझ्यासाठी लावलेले शुभेच्छा फ्लेक्स काढून टाका, अशी भावनिक साद भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी घातली आहे.
महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!
पिंपरी- चिंचवड शहरात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपा आणि आमदार लांडगे समर्थकामध्ये संताप व्यक्त होत आहे.
आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा
दरम्यान, भोसरीच्या गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ” रंग जल्लोष…पांडू स्पेशल” हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी सुरू होता. सुमारे ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी आपल्या समर्थक, हितचिंतक आणि पदाधिकारी- नगरसेवक यांना भावनिक आवाहन केले.
चंद्रकांत पाटलांपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल; मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत?
आमदार लांडगे यांचा वाढदिवस २७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. याच पार्श्वूभूमीवर समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. तशा प्रकारच्या शुभेच्छांचे बॅनरही शहरभर लावले आहेत. मात्र, प्रशासनाच्या सुचनेनंतर संबंधित बॅनर काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे आमदार समर्थक आणि हितचिंतकांमध्ये नाराजीचा सूर असून, प्रशासन राजकीय हेतूने राडीचा डाव करीत आहे, अशी टीका होऊ लागली आहे.
काय म्हणाले महेश लांडगे….?
आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हटले आहे की,
कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांना नम्र आवाहन….
महापालिकेच्या आयुक्तांनी आज सायंकाळी आपले फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग काढायचे आदेश दिल्याचे समजले. त्याला अनुसरुन माझे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, नातेवाईक आणि हितचिंतक या सर्वांना नम्र आवाहन आहे की, महापालिकेचे अधिकारी हे सर्व आपलेच आहेत. शहराच्या विकासासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून ते आपल्या सोबत काम करीत आहेत.
पण, त्यांच्यावर राज्य सरकार आणि नेत्यांचा असलेला दबाव आपण समजू शकतो. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे लक्षात येते. गेले दीड-दोन वर्ष अधिकारी दबावाखाली काम करत असतानाही आपण प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे.
आजही माझ्या वाढदिवस अथवा वैयक्तिक कार्यक्रमामुळे जर अधिकारी आणि प्रशासनाला अडचण येत असेल. अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागत असतील, तर सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे.
उद्या (दि.२७) माझा वाढदिवस असला, तरी उद्याच सगळे फ्लेक्स तुम्ही स्वतःहून काढून टाका आणि अधिकारी व प्रशासनाला सहकार्य करा…याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असे मी समजतो.
आजवर प्रत्येक संघर्षात आपण साथ दिली, हा महेश लांडगे आयुष्यभर आपला विश्वास जपेल.
प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करा…!
आपला,
महेश किसनराव लांडगे.
शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड.
Read Also :
- महापालिका आयुक्तांचे आदेश : आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाका!
- शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर छापा; किरीट सोमय्यांच्या आरोपावर ED ‘अॅक्शन मोड’मध्ये
- पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार- नाना पटोले
- कोल्हापूरात काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध; भाजपच्या अमल महाडिकांची निवडणूकीतून माघार
- मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार आहे; नारायण राणेंच्या दाव्याने उडाली खळबळ