नवी दिल्ली : महाराष्ट्र सध्या ६ जागांवर विधानपरिषदेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यात दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव आणि शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांची विधानपरिषद आमदारपदी निवड करण्यात आली आहे. आता बाकीच्या ४ जागा देखील बिनविरोध होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
अशातच अचानक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट दिल्ली वारी केली आहे. त्यांच्या दिल्लीवारीत नेमकं काय झालं आहे हे अद्यापही स्पष्ट झालं नाही. त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
ठरलं तर…! विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली”, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. यातच आता आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट नाही. चंद्रकांत पाटील आणि फडणवीस हे दोन्ही महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांच्या अचानक एका पाठोपाठ दिल्ली दौऱ्यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे हे मात्र नक्की.
राज्यात ठाकरे, पवार यांनी एकत्र यावं ही तर बाळासाहेबांची इच्छा; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता की अचानक हा दौरा ठरला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. असं म्हटलं जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित काही बैठका आहेत आणि त्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले आहेत. यासोबतच राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचं पूर्नवसन सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांना आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांनाही विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Read Also :
- आठमुठेपणा घेऊन एसटी सेवा ठप्प ठेवली तर कारवाई करावीच लागेल; अनिल परबांचा इशारा
- मी भाजपात प्रवेश करतोय, म्हणताच शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे झाले अवाक्
- ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश
- कोल्हापुरातील आगामी राजकीय समीकरणे घडणार महाडिक विरुद्ध पाटील लढतीतून
- राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न ‘या’ ठिकाणी नाहीच; लंके विरुद्ध औटी यांच्यात होणार प्रतिष्ठेची लढाई