जळगांव : राज्यात शिवसेने नेते संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच जळगावातील आणखी एका बड्या प्रस्थाच्या घरी विवाह सोहळा संपन्न होत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा आज विवाह सोहळा पार पडत आहे. चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची कन्या प्रेरणा हिच्यासोबत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव यांनी अहिराणी भाषेतील गाण्यावर ठेका धरला.
भाजपला मोठं खिंडार; भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरचं घरवापसी होणार…
जळगाव लग्नसोहळा नृत्य, गाणे वाजवणे आलंच. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही रविवारी आपल्या लहान चिरंजीवाच्या लग्नसोहळ्यानिमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात ठेका धरत सर्वांचेच लक्ष वेधले. अहिराणी भाषेतील गीतांवर नृत्य करणाऱ्या पालकमंत्र्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
VIDEO: लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका pic.twitter.com/JiWpuOJ1qb
— The मराठी Medium (@MarathiMedium) November 29, 2021
गुलाबराव पाटील हे शेतकरी कुटुंबात वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची त्यांना विशेष जाणीव आहे. गुलाबराव पाटील यांच्या होणाऱ्या सुनेचे वडील भगवान पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. तसेच घरची शेतीसुद्धा तेच सांभाळतात. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पाडणार आहे. चोपडा तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार असून यावेळी विविध मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.
Read Also :
- “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी का?”
- …आणि अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर !
- ‘केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- ‘१ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?’; राजेश टोपे म्हणाले…
- महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच पर्दाफाश..