सांगली – सांगली जिल्हा बँकेची यंदाची निवडणूक चांगलीच वादग्रस्त ठरली होती. आटपाडी गावामध्ये ठरवधारकांच्या पळवापळवीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचे सगळ्यांना पाहायला मिळाले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
यानंतर घटनास्थळी असलेल्या राजकीय नेत्यांच्या गाडयांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर आणि दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात निवडणुकीसाठी मतदान पार पडले.
दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात झालेल्या लढतीत महाआघाडीने १७ विरूद्ध ४ मतांनी वर्चस्व सिद्ध केले. महाआघाडीने सर्वाधिक जादा जागा मिळवल्या, तरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा जतमधील पराभव आणि बँका व पतसंस्था गटात किरण लाड यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे.
या पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत चर्चा रंगली आहे. काहींनी आरोप व प्रत्यारोप देखील केले आहेत. आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. हे सर्व सुरु असतानाच अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीची अधिसूचना निघाली आहे.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक प्रबळ दावेदार आहेत. कॉंग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार असून जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आणि महेंद्र लाड हे दावेदार मानले जातात. अध्यक्षपदाच्या निवडीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळत आहे.
सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार निकालानंतर पंधरा दिवसात अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणे बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सहकार विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची ६ डिसेंबरला निवड होईल
Read Also :
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप