मुंबई : कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने जगाची झोप उडवली आहे. कोरोनाच्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचे कर्नाटकात दोन रुग्ण आढळल्यानंतर चिंता वाढली होती. त्यातच आता संकट आणखी जवळ आल्याचं दिसतं आहे. मुंबई महानगर पालिकेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेतून आलेले तब्बल ९ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत.
साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील एका प्रवाशासह 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या रुग्णांना ओमिक्रॉनची बाधा झाली की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
9 international travellers including one from South Africa who arrived at Mumbai International Airport between 10th Nov -2nd Dec have tested positive for COVID19. Their samples have been sent for genome sequencing: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/sBHFMcv9LK
— ANI (@ANI) December 3, 2021
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचे दोन रूग्ण गुरुवारी कर्नाटकात आढळून आल्यापासून देशाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या या दोन रूग्णांपैकी एक रूग्ण दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली.
Read Also :
- चीनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी आत्ताच सावध व्हा; शिवसेनेचा केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला
- मावळ तालुक्यात झालेले ‘ते’ दोन पक्षप्रवेश पडणार कोणाच्या पथ्यावर?
- पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता महेश लांडगे!
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!