मुंबई : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांत रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मागील वेळी बॅंक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक (मुंबई) या निवासस्थानी भेट घेऊन बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे.
एका उमद्या सहकाऱ्याचं अवेळी निघून जाणं क्लेशदायक – उद्धव ठाकरे
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे सध्या भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. सध्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर बँकेच्या अध्यक्ष पदावर संधी मिळावी म्हणून काही संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केलीय. यामध्ये वाईचे नेते नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर काल (गुरूवारी) सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती.
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्ष पदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळं दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितलं होतं. आज दुसऱ्याच दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सकाळी दहा वाजता भेट घेतली. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा इच्छुक असून मला पुन्हा संधी द्यावी, ही मागणी केली. दरम्यान, शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कौतुक करताना कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहात, असे गौरवोद्गार काढले.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेत राजकारण नसल्याने बँक चांगली चालली आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली होती. आता पुन्हा संधी दिली तर अध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यावर तुम्ही अजितला भेटला का, असं विचारले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी अजित दादांची कालच भेट घेतली असून यामध्ये बँकेविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मी अजित व रामराजेंशी बोलतो, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार शिवेंद्रसिंहराजेंच्या विनंतीला मान्यता देणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सध्या वाईचे नेते नितीन पाटील यांचं नाव आघाडीवर आहे.
Read Also :
- नगरमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा? सुजय विखेंचा कोल्हेंना प्रश्न
- मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!
- महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश
- टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध
- ‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा