मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इतर पक्षातील नेत्यांना गळला लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. गुरुवारी पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विदर्भातील बड्या नेत्याला पक्षात घेऊन मोठा दणका दिला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील मनसे उपजिल्हा प्रमुख, नगरसेवक जयवंतराव वाकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. यावेळी आमदार सुनील शेळके, प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, अमरावती ग्रामीणचे कार्याध्यक्ष अनिल ठाकरे उपस्थित होते.
पीएम केअरमधून मिळालेले व्हेंटिलेटर्स खराब आणि बिनकामाचे – खासदार विनायक राऊत
तसेच वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शरद पवारांचे कुटुंब आहे. या कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच सुटतील. कार्यकर्त्यांची काळजी घेणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करून पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शरद पवारांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.
“काँग्रेस कधी उटांसारखी तिरकी चालत नाही”; ममतांच्या दौऱ्यावरून अशोक चव्हाणांनी झापले
तसेच ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. यासोबतच मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरतशेठ काळोखे यांनीही हाती घड्याळ बांधले. सोबतच वाशिम जिल्ह्यातील भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Read Also :
- महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश
- टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध
- ‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
- कारवाईचा बडगा: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करणार; अनिल परबांचा इशारा