नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज कोरोनावर चर्चा सुरु आहे. या चर्चेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बोलताना पीएम केअर्स फंडातून मिळालेले व्हेटिंलेटर्स खराब असून त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. आजही ६० टक्के व्हेटिलेटर्स बंद आहेत. ते दुरुस्तीसाठी टेक्निशियन वेळेत येत नाहीत अशी तक्रारही त्यांनी संसदेत केली. दरम्यान, सुरुवातीलाच त्यांनी भारत कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचंही म्हटलं.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
कोरोनाचे अनेक प्रकार पाहिले. डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉन येतोय – जातोय. तो नाही आला तर चांगलंच, पण येऊ न देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. ओमिक्रॉन येऊ नये हीच प्रार्थना करतो असं म्हणत खासदार राऊत यांनी देशातील जनतेचं अभिनंदन केलं. भारतावर कोरोनाचं आक्रमण होत होतं. कोरोनाची महासाथ आली असताना तिच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळेच पंतप्रधानांसोबत उभा राहिले. मोदींनी दिवे लावले, थाळ्या वाजवल्या किंवा लसीकरण मोहिम असेल यात देशाने मोदींना सहकार्य केल्याचंही खासदार राऊत यांनी सांगितलं.
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
महाराष्ट्रात शिवसेना महाविकास आघाडी सरकारचं सरकार आहे त्यांनीही राजकारण न करता सहकार्य केलं. देशात तयार केलेल्या लशीचा पुरवठा जगाला केला. मुंबई, महाराष्ट्रासह देशात कोरोनावर राजकारण व्हायला नको होतं. कोरोनासंदर्भात मदत देताना केंद्राकडून विरोधकांचे राज्य सरकार जिथं आहे तिथं कमी जास्त देण्याचे प्रकार झाल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला.
मुंबईत दीड लाख लोक दगावतील असे अनेकांनी म्हटले, पण सुदैवाने महाविकास आघाडीच्या कामामुळे कोरोना आटोक्यात आला. मोदींच्या सूचना राज्यात उद्धव ठाकरेंनी अमलात आणल्या. धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोना रोखला. मुंबई पालिकेच्या माध्यमातून आणि कोरोना योद्धे, सामाजिक संस्थांच्या मदतीने जगाला आदर्श घालून दिला. धारावी पॅटर्न जगाला दाखवला. धारावी आज कोरोनामुक्त झाल्याचंही राऊतांनी म्हटलं.
कोल्हापूरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे पहाटे निधन
पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर ६० टक्के खराब असून आजही वापरले नाहीयेत. ज्या एजन्सीला काम दिले त्यांनी पैसे घेतले पण क्वालिटी नसलेले व्हेटिंलेटर दिले. टेक्निशियन मिळत नव्हते. हजारोंच्या संख्येनं व्हेटिंलेटर दिले ते लोकांना उपयोगी पडले नाही. या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी चर्चेवेळी खासदार विनायक राऊत यांनी केली.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, परमबीर यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा..
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
- वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही – बाळासाहेब थोरात
- मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला