मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आज परमबीर सिंह यांच्या निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे त्याचबरोबर सुट्टीचा कालावधी संपला तरीही परमबीर हे कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निलंबनासंदर्भात सरकारने कारवाई सुरू केली होती.
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे ‘फरार’ घोषित केल्यानंतर ते मुंबईत परतले. ते खंडणीच्या एका प्रकरणात मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याआधी सांगितले की, सरकार त्यांच्याविरुद्ध पोलीस सेवा नियमानुसार कारवाई करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबन फाईलवर सही केली आहे. त्यामुळे परमबीर यांचे निलंबन होणार आहे.
गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृह विभागाने अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 3 अंतर्गत परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता. ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांची सही होणे बाकी आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.
Read Also :
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
- वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही – बाळासाहेब थोरात
- मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- कोल्हापूरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे पहाटे निधन