पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. सध्या कोरोना महामारी नियंत्रणात असल्याने आणि लसीकरणाचा टप्पा वाढल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
पीडीसीसी`ची पंचवार्षिक निवडणूक नवीन वर्षात २ जानेवारीला होऊ घातली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१ डिसेंबर) आतापर्यंत सर्वाधिक २५ उमेदवारी अर्ज ११ उमेदवारांनी दाखल केले. आतापर्यंत २९ उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे,आमदार (खेड) दिलीप मोहिते-पाटील, आमदार संजय जगताप (पुरंदर) आणि विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात यांचा समावेश आहे.
ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
सर्वाधिक सहा उमेदवारी अर्ज संजय काळे यांनी दाखल केले आहेत. त्यांनी पहिल्या दिवशी देखील एक अर्ज दाखल केला असल्याने आता त्यांच्या उमेदवारी अर्जांची संख्या सातवर गेली आहे. त्यांच्याजोडीने पहिल्या दिवशी मोहिते, जगताप तसेच, थोरात यांनी ‘अ’ वर्ग म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आहेत. काळे यांच्या खालोखाल ‘अ’ वर्गातूनच मावळ तालुक्यातून ज्ञानोबा ऊर्फ माऊली दाभाडे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते सध्याला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहे.
वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
पीडीसीसीच्या २१ संचालकांच्या जागांकरिता दोन जानेवारीला मतदान, ४ तारखेला निकाल आहे. २१ जागांपैकी सर्वाधिक १३ जागा ‘अ’ वर्ग मतदारसंघामध्ये आहेत. एकेक जागा ब (पणन,प्रक्रिया), क (पतसंस्था,नागरी बॅंका), ड (उर्वरित), एससीएसटी, एनटी, ओबीसी आणि महिला अशी आहे, असे निवडणूक अधिकारी मिलिंद सोबळे यांनी सांगितले आहे. २९ नोव्हेंबरपासून बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. त्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे.
Read Also :
- कोल्हापूरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे पहाटे निधन
- ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अवमान; भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
- चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो
- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
- “आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका