पुणे : इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणुचे कारण देत पुण्यासह मुंबई, नाशिक आदी महापालिकांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अनिश्चित आहे. पण भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेने आयत्यावेळी घेतलेल्या या निर्णयावर पक्षाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत.
निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
एक डिसेंबरपासून राज्यभरात शाळा सुरू होणारच, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठामपणे सांगितले होते. त्यानुसार अऩेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शाळांची स्वच्छता, फुले, रांगोळीने शाळा सजवल्या होत्या. पण पुण्यासह अनेक महापालिकांनी त्यांच्या पातळीवर वेगळा निर्णय घेत राज्य सरकारला तोंडावर पाडले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी (ता. 30) शाळा सुरू केल्या जाणार नाहीत, हे जाहीर केले.
वर्ग तरीही रिकामेच…!!
1 डिसेंबरचा निर्णय अगदी आयत्या वेळी बदलला.
पालक, विद्यार्थी, रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली. Sanitization,रांगोळी,तोरणे, वर्गशिक्षकांनी पालकांना केलेले अगणित फोन सर्वच व्यर्थ.
15 डिसेंबर चा निर्णय थोडा वेळेत सांगायला हवा होता.@PMCPune pic.twitter.com/WBV2gNzAng— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) November 30, 2021
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उघडपणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करून महापालिका व महापौरांच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘1 डिसेंबरचा निर्णय अगदी आयत्या वेळी बदलला. पालक, विद्यार्थी, रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली. सॅनिटायझेशन, रांगोळी, तोरणे, वर्गशिक्षकांनी पालकांना केलेले अगणित फोन सर्वच व्यर्थ गेले. 15 डिसेंबर चा निर्णय थोडा वेळेत सांगायला हवा होता, असं कुलकर्णी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
दरम्यान, मंगळवारी महापालिकेकडून शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच महापौरांनीही याबाबत घोषणा केली. पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असं महापौरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Read Also :
- दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
- हिवाळी अधिवेशन: पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील भास्कर जाधव नावाचं अस्त्र गाजणार का?
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती