नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याबद्दल टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत म्हणालेत ‘लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापता तर मृत्यू प्रमाणपत्रांवरही त्यांचा फोटो छापायची जबाबदारी घ्यावी लागेल.’
एका उमद्या सहकाऱ्याचं अवेळी निघून जाणं क्लेशदायक – उद्धव ठाकरे
भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी यांनी या आक्षेपाला सणसणीत उत्तर दिले ‘लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये ज्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?’ राजकारण करायची वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही, असे सुजय विखे यांनी बजावले.
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
लोकसभेत काल ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या संकटावर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना सुजय म्हणालेत “कोरोना काळातल्या कामासाठी महाराष्ट्रातल्या सरकारच्या तिन्ही पक्षांच्या लोकांना भारतरत्न दिले पाहिजे. महाराष्ट्रात अद्याप एकही लस सरकारने विकत घेतलेली नाही! जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बुस्टर डोसबाबत परवानगी दिलेली नाही. तरीही केंद्र सरकारवर आरोप केले जात आहेत. पुढचा धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जाते. त्यातील किती लहान मुले ‘पॉझिटिव्ह’ झाली? माझी सर्वांना विनंती आहे या सर्व विषयांवर अभ्यासपूर्वक बोलावे. गुगलमध्ये सर्च करुन भाषण करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे चूक आहे.”
Read Also :
- मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!
- महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश
- टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध
- ‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?