जळगाव – जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित झाले आहेत. ते आता अर्ज दाखल करीत आहेत.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद आहे. मात्र, अनेकजण इच्छुक असल्याने पेच निर्माण झाला होता. आज सकाळी बँकेवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक आज होत आहे. सुरवातीचे तीन वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल हे सूत्र ठरले आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांची नावे चर्चेत होती. अखेर देवकरांनी यात बाजी मारली आहे.
बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक संचालक आहेत. त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. काल झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत नाव जाहीर झाले नव्हते. आज सकाळी निवडणुकीच्या आधी झालेल्या बैठकीत नाव निश्चित करण्यात आले. अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव अग्रस्थानी होते. विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता होती. तसेच, ऐनवेळी एकनाथ खडसे हेसुद्धा अध्यक्ष होण्याचे बोलले जात होती.
कोरोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; परराज्यातून येणाऱ्यांसाठी आणि शाळांबद्दल म्हणाले…
याबाबत माहिती देताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला दोन वर्षे, काँग्रेसला दोन वर्षे व राष्ट्रवादी काँग्रेसला एक वर्षे देण्यात येणार आहे. याला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दिली आहे.
Read Also :
- वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक
- किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; राष्ट्रपतीच्या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध
- पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
- नगरमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा? सुजय विखेंचा कोल्हेंना प्रश्न
- मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!