बुलढाणा : जोपर्यंत वीज कनेक्शन जोडून दिली जात नाहीत तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाणा महावितरण कार्यालयात घेतला आहे. आमदार महाले यांच्या समवेत त्यांचे असंख्य कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयातील प्रमुखांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शेतक-यांच्या थकीत बिलाच्या कारणास्तव ग्रामीण भागातील वीज पुरवठा महावितरणकडून खंडित केला जात आहे. त्यामुळे रब्बी पीक धोक्यात आली आहेत. यामुळे अनेक शेतक-यांनी आमदार महाले यांना भेटू त्यांच्या व्यथा मांडल्या. आमदार महाले यां सर्व शेतक-यांसमवेत महावितरण कार्यालयात गेल्या. तेथे त्यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा केली. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आमदार महाले यांनी जोपर्यत वीज कनेक्शन पुर्ववत केली जात नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेत महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला.
टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील तसेच चिखली तालुक्यातील वीज महावितरण कंपनीने तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यात यावे या मागणीसाठी चिखली येथील मुख्य महामार्ग पुणे नागपूरवर तब्बल चार तास रास्ता रोको भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते सहभागी होते.
Read Also :
- किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; राष्ट्रपतीच्या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध
- पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
- नगरमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा? सुजय विखेंचा कोल्हेंना प्रश्न
- मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!
- महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश