नांदेड : एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन सुरू असताना नांदेड येथील एका एसटी कर्मचाऱ्याला बोवळ आल्याने तो आंदोलनस्थळी पडला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा आज मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला.
मोठी बातमी: ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव; कर्नाटकमध्ये दोन रुग्ण सापडले
50 वर्षीय दिलीप वीर हे नांदेड आगारात वाहक पदावर कार्यरत होते. नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काल दिलीप वीर यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. पण ते हजर झाले नाही. आपल्याला देखील आता निलंबित केले जाईल या तणावात ते होते. कुटुंबातील लोकांना देखील त्यांनी याबाबत सांगितले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते तणावात होते.
त्यांना दोन मुलं दोन मुली आहेत. मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने आर्थिक परिस्थिती देखील गंभीर बनली होती. दरम्यान काल ते बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ते आले. सायंकाळी अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आंदोलनस्थळावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सूरु असतांना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
ही बातमी येताच बसस्थानकात मोठ्या संख्येने कर्मचारी जमले. मयत दिलीप वीर यांचा मृतदेह बस स्थानकात आणून ठेवण्यात आला. या ठिकाणी राज्य शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने विलीनीकरणाची मागणी मान्य करावी. मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबाला तातडीने पन्नास लाख रुवयांची रोख मदत करावी. जोपर्यत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवनार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. नांदेडमध्ये अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी बसेस पूर्णपणे बंद आहेत. नांदेड आगारात जवळपास 300 जणांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे अनेक जण तणावात आहेत.
Read Also :
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी
- वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक
- किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; राष्ट्रपतीच्या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध