मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे चांगल्याच वादात सापडले आहेत. पुणे विमानतळावर दर्शनी भागांत लावण्यात आलेल्या पेशव्यांच्या पेंटिग्जवरून कोल्हे यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. कोल्हेंनी केलेल्या या ट्वीटमुळं नेटकऱ्यांनी कोल्हे यांच्यावरच प्रश्नांचा भडिमार केला आहे.
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी.१/२ pic.twitter.com/eLOrOQ2497
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 3, 2021
खासदार कोल्हे यांनी पुणे विमानतळावर घेतलेला एक सेल्फी ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट केलेल्या सेल्फीमध्ये एका भिंतीवर पेशवेकालीन चित्रं दिसत आहेत. त्याचाच संदर्भ देत कोल्हे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या माध्यमातून कोल्हे यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाला लक्ष्य केलं आहे.
भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
‘पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहाल सुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी हे देखील आहे. तसंच, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट ऑथॉरिटीला विसर पडला की काय?,’ असा सवाल कोल्हे यांनी केला आहे.
कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे व केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाला टॅग केलं आहे आणि वरील प्रश्न विचारला आहे. कोल्हेंनी केलेल्या या ट्विटनंतर त्यांच्यावर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि समस्यांचा भडीमार युझर्सनि सुरु केला आहे.
किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडीत मुद्द्यांवर बोला. भावनिक मतं मांडू नका, असा सल्ला काहींनी त्यांना काही युझर्सनी दिला आहे. तर, काहींनी कोल्हे यांना स्वत:च्या मतदारसंघाकडं लक्ष देण्याचा खोचक सल्ला दिला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या अवस्थेची काळजी घ्या, असं सुनावलं आहे. ‘फोटोंपेक्षा महाराजांचे किल्ले सांभाळण्याची जबाबदारी घ्या. आपण स्वत: खासदार आहात, बोलण्याऐवजी कृती करा, असे टोमणे देखील युझर्सनी कोल्हेंना मारले आहेत.
Read Also :
- “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यावरून दोन वकिलांमध्ये होणार संघर्ष; सदावर्ते विरुद्ध परब संघर्ष न्यायालयात होणार सुरु
- पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल
- राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
- ‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच