पुणे – आगामी देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालीस चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर समझोता झाला नाही तर, कॉंग्रेस पक्षाकडून आघाडीचा प्रस्ताव आल्यास कॉंग्रेसला बरोबर घेवून देहू नगरपंचायतीची निवडणूक लढवू, असे सुतोवाच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिले. देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुकांची मुलाखत घेण्यात आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
सचिन अहिर म्हणाले, पीएमआरडीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्याबरोबर आघाडी केली. त्यावेळी आम्ही त्यांच्या उमेदवारांना मदत केली. देहूतील नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेने बरोबर आघाडी होण्यास विलंब होत आहे. खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनिल शेळके यांची याबाबत येत्या दोन दिवसात चर्चा होईल. तुर्तास नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास आघाडीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र, अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही.
…तर मृत्यू प्रमाणपत्रावरही पंतप्रधान मोदींचा फोटो लावा; संसदेत खासदार अमोल कोल्हेंची फटाकेबाजी
दरम्यान नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यावेळी देहू शहर शिवसेना प्रमुख सुनिल हगवणे, बाबा भालेकर, रमेश हगवणे, राजेंद्र काटे, रमेश जाधव, लतिका फास्ते, राजेश पळसकर, राजेश खांडभोर, नगरसेविका कल्पना आखाडे, शैला खंडागळे आदी उपस्थित होते.
Read Also :
- सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
- सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
- सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला