मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाडबिनविरोध निवडून जाणार आहेत. उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्याविरोधात कुणीच अर्ज न भरल्याने दोघांची बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवड होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..
निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या दिवशी बँकेवर वर्चस्व असलेल्या सहकार पॅनेलच्या 21 उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी कैलास जेबले यांनी अर्ज स्वीकारले. या उमेदवारांमध्ये दरेकर व लाड यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, सिध्दार्थ कांबळे, संदीप घनवट, नंदकुमार काटकर, विठ्ठलराव भोसले, अभिजित अडसूळ, पुरूषोत्तम दळवी, आनंदराव गोळे यांचाही समावेश आहे.
अभिषेक घोसाळकर, विष्णू घुमरे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, विनोद बोरसे, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, नितीन बनकर या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. या पॅनेलच्या विरोधात काही मोजक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवारही त्यांचे अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने सहकार पॅनेचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडूण येण्याची शक्यता आहे.
परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
अखेरच्या दिवशी दरेकर व लाड यांच्याविरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे त्यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरेकर हे बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा पुढील पाच वर्षे तेच अध्यक्षपदी राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळताना दिसत आहे.
Read Also :
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी