पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रियांका बारसे यांनी व्यासपीठावर हजेरी लावल्यामुळे राष्ट्रवादीतील स्थानिक इच्छुकांची अस्वस्थता वाढणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता महेश लांडगे!
ज्येष्ठ नगरसेवक गव्हाणे यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओळखपत्राचा वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित केला होता. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपा नगरसेविका प्रियांका बारसे यांचे उपस्थिती होती. तसेच, भोसरी मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
लांडेंची अनुपस्थिती अन् गव्हाणेंचा कार्यक्रम फेल…
माजी आमदार विलास लांडे यांच्याशिवाय पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्तुळ पूर्ण होवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून भोसरीतील राष्ट्रवादीची सूत्रे अजित गव्हाणे यांच्याकडे दिली आहेत. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून गव्हाणे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या कार्यक्रमांना लांडे दिसत नाहीत. शुक्रवारी झालेला कार्यक्रम हा दुपारी ४ वाजता आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम तब्बल दोन तास उशीरा सुरू झाला. त्यामुळे गव्हाणेंचा कार्यक्रम लांडेंच्या अनुपस्थितीमुळे फेल झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारसे, गोफणेंना संधी अन् गवळी, शिंदे, फुगे ‘वंचित’…?
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भाजपा नगरसेविका प्रियांका बारसे यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे त्याचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नगरसेविका अनुराधा गोफणे आणि प्रियांका बारसे यांना विद्यमान नगरसेविका म्हणून तिकीट वाटपात पहिले प्राधान्य द्यावे लागणार आहे. परिणामी, याच परिसरातून तीव्र इच्छुक असलेले माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, योगेश गवळी, अमर फुगे यांना तिकीटापासून ‘वंचित’ रहावे लागेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, २०१७ च्या निवडणुकीत अमर फुगे हे गव्हाणे यांच्या पॅनेलमध्ये होते. वास्तविक, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले, तरी या प्रभागातून राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
खासदार कोल्हेंची दुटप्पी भूमिका : भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘‘प्रधानमंत्री जन आरोग्य’’ योजनेची ओळखपत्र वाटप करुन राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदींच्या पुढाकाराने संपूर्ण देशात मोफत कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, आपल्या मतदार संघात पाच लाख लस मोफत देवून स्वत:ची पाठ थोपटून घेणारे खासदार कोल्हे लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नको, अशी मागणी संसदेत उपस्थित करतात. मोदींच्या योजनांचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करायचा आणि दुसरीकडे संसदेत टीका- टिप्पण्णी करायची, अशी दुटप्पी भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शोभणारी नाही. कोरोना काळात देशात झालेल्या मृत्युंना पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, अशी टीका करणारे खासदार अमोल कोल्हे शिरुर मतदार संघात कोरोनामुळे झालेल्या मृत्युंना जबाबदार आहेत का? अशा प्रश्न भाजपाचे सरचिटणीस राजू दुर्गे यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट