मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १ महिन्यापासून बेमुदत संप सुरु आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या दोन मुद्द्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात आणि प्रत्येक जिल्ह्यातील काही डेपोंमध्ये ठाण मांडून बसले आहेत. आता सरकारनेही दोन पाऊले पुढे येत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा घोषणा केली आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मिटवण्याची भूमिका घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाला दिलेला पाठींबा काढून घेतला आहे आणि संपातून थेट माघार घेतली आहे. त्यानंतर ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केल्याने अजूनही संप सुरु आहे आणि आंदोलन सुरूच आहे.
यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांवर थेट नीलनबाणाची आणि मेस्मा कायदा लावण्याची भाषा नुकतीच केली आहे. यानंतर संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हा कायदा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या कारवाईत कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे.
अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की एसटी अत्यावश्यक सेवेत येत नाही अशी अफवा काहींनी पसरवली आहे. पण हे चुकीचे आहे. माहिती अधिकारात मागविलेली माहिती आणि दिलेली माहिती यात तफावत असू शकते. तालुका ते गाव हे जोडण्याचे काम एसटी करते. त्यामुळे एसटी हि अत्यावश्यक सेवेत येते, आणि त्यांना मेस्मा कायदा लागू होतो, असेही परब यांनी स्पष्ठ केले आहे.
पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
दूसऱ्या बाजूला याच मेस्मा कायद्यावरुन अनिल परब आणिऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. परब यांच्या मेस्माच्या इशाऱ्यानंतर विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मेस्मा लागत नाही असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच सदावर्ते यांनी अनिल परब यांच्या कायद्याच्या अभ्यासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि म्हटले आहे की काही माणसांनी डिग्री करताना कायद्याचा किती अभ्यास केला आहे हे त्यांनाच माहित.
Read Also :
- पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल
- राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
- ‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
- सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
- सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध