मुंबई – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे आणि इतर काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपावरून राज्यात वातावरण चांगेलच तापले आहे. त्याचबरोबर, सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊनही ते संपावर ठाम आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली आहे. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला टोलेबाजी केली आहे.
सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
विलीनीकरण वगळता सर्व मागण्यांवर सरकार आणि कामगार संघटना सहमत आहेत. मात्र कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू केले आहे. लातूर आगारातील एक वाहक महिला प्रसूतीसाठी रजेवर असून, शासनाने त्यांना निलंबनाची नोटीस बजावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
निव्वळ मूर्खपणा लावला आहे, बिनडोक लोक सत्तेवर बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार, अशी टीका करत लातूर डेपो मधील सारिका लाड या वाहक म्हणून महामंडळात सेवा देत असून यांनी प्रस्तुती करिता रजेवर जाण्यासाठी अर्ज केलेला होता. परंतु या बिनडोक सरकारने या महिलेला आज निलंबनाची नोटीस बजावली आहे, असे ट्विट खोत यांनी केले आहे.
निव्वळ मूर्खपणा लावला आहे, बिनडोक लोक सत्तेवर बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार.
लातूर डेपो मधील सारिका लाड या वाहक म्हणून महामंडळात सेवा देत असून यांनी प्रस्तुती करिता रजेवर जाण्यासाठी अर्ज केलेला होता. परंतु या बिनडोक सरकारने या महिलेला आज निलंबनाची नोटीस बजावली आहे. pic.twitter.com/22cIdBzMCJ
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 3, 2021
Read Also :
- लहू बालवडकर “फस्ट एड पॉलिक्लिनिक” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
- अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
- सहावीला पिंपरी चिंचवडला आलो; ‘त्या’ पोस्टरने शहरात पुन्हा उडाली खळबळ
- …तर तिसरी लाट ओमायक्रॉनची असेल; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत