मुंबई : राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रकरणावरती आज छगन भुजबळ यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे की, निवडणूका घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूका पुढे ढकला; असं प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
तसेच टप्याटप्यांमध्ये निवडणूक घेता येणार नाही, अन्यथा सर्व निवडणूक पुढे ढकला, इम्पीरिकल डेटा आम्ही देतो. तो गोळा होईपर्यंत निवडणूक घेण्याची परवानगी द्या. राज्य सरकार निवडणुकांबाबत कोर्टासमोर दोन भूमिका मांडणार सुप्रीम कोर्टासमोर आम्ही जात आहोत. सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत असही भुजबळ म्हणाले.
मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ही मागणी करणार, अथवा ओबीसी स्थगिती न देता संपूर्ण निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती करणार असून निवडणूका दोन टप्प्यात घेण्याने चुकीचा पायंडा पडेल असही ते म्हणाले. पुढील आठ महिन्यात इम्पिरीकल डेटा आम्ही सादर करू असे न्यालायला सांगणार सांगणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय आपण आज दिल्लीला जाणार असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, हीच भूमिका राज्यसरकार सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघात: तब्बल नऊ जणांचा मृत्यू, बिपिन रावतांची प्रकृती चिंताजनक
- “आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा”
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब