मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटी-शर्तीसह जामीन मंजूर झाला आहे. मात्र, आशिष शेलार यांनी हा फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
गेल्या आठवड्यात मुंबईत वरळीला एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास तीन दिवसांनी महापौर रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावरुन आशिष शेलार यांनी पत्रकार घेतली होती. त्यात त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते, असा आरोप महापौरांनी केला आहे. याबाबत पेडणेकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी मुंबईच्या नरिमन पाईंट पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. त्यावरून आशिष शेलारांवर भादंवि कलम 354,509 नुसार विनयभंग असा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
आज शेलारांनी पोलिस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला. त्यानंतर त्यांना अटी-शर्तीसह जामीन मंजूर झाला. तसेच त्यांनी भाजपवर टीका देखील केली. याच मुद्द्यावर भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द व्हावा यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Read Also :
- स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले, भीक म्हणून मिळाल्या तर त्या पदव्या आणि पुरस्कार – कन्हैयाकुमार
- भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा ठाकरे सरकारचं येणार अन् मुख्यमंत्री…; जितेंद्र आव्हाड
- भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा